त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री मारुती मंदिरात भव्य दीपोत्सव उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त तळेगाव दाभाडे येथील श्री मारुती मंदिरात मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला असून, आकर्षक रांगोळी आणि दीपसजावटीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
या दीपोत्सवासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे राहून योगदान देणारे श्री दिगंबर कुलकर्णी, देशमाने काका, श्री प्रकाश केदारी, श्री संतोष दिवटे, श्री स्वप्नील बारमुख यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकजुटीतून दीपोत्सव यशस्वी
मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेडगे, सचिव श्री महेंद्र कसाबी, सहखजिनदार राहुल निगडकर, श्री अनिकेत वैरागी, श्री सुरेंद्र बारमुख, निलेश बारमुख, तुषार जगनाडे, मिलिंद कसाबी आणि गोरख टेकवडे यांच्यासह सर्व सदस्यांनी दीपोत्सवाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
श्री मारुती मंदिर हे धार्मिक श्रद्धास्थानासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वपूर्ण केंद्र व्हावे, या उद्देशाने समिती कार्यरत आहे. भविष्यातही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून मंदिराची ओळख अधिक उंचावण्याचा समितीचा मानस आहे.
सर्वांच्या एकजुटीने आणि निःस्वार्थ सेवाभावाने त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.
– अखंड भारत जन आवाज न्यूज






